महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची सरकारी दवाखान्यात झाली प्रसूती!

19 Aug :- बारीक बारीक आजारांसाठी सरकारी रुग्णालय डावलून खाजगी रुग्णालयात धाव घेणाऱ्या सर्वसामन्या साठी,आणि इतरत सर्वांसाठीच आश्चर्यास्पद निर्णय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.सरकारी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत असा सर्वसामन्याचा समज आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास अनेकजण घाबरतात.मात्र मार्च महिन्यात नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नीला प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यात दाखल केलं. त्यांच्या पत्नीची प्रसूती नॉर्मल झाली. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले.

खासगी हॉस्पिटल्सच्या सर्व सोयी नाकारत जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वास दाखविल्याने डॉक्टरही भारावून गेले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नीला प्रसूतीसाठी श्यामनगरच्या महिला सरकारी दवाखान्यात दाखल केले.याच सरकारी रुग्णालयात सरकारी डॉक्टर आणि सरकारी परीचारिकांनी प्रसूती केली. सरकारी रुग्णालयात देखील सर्व सोयी आहेत.

हे वाचा- ठाकरेंचा सरकारला रोखठोक सवाल!

इथे देखील उत्तम उपचार मिळतात हेच दाखवून देत जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी एक नवा आदर्श घालून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने जिल्हाधिकाऱ्यांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. अशा काळात पत्नीची काळजी घेत सरकारी दवाखान्याची निवड केल्याने त्यांचं कौतुक होत आहे. अशा निर्णयामुळे जर सरकारी व्यवस्था बदलली आणि लोकांचा विश्वास वाढला तर तो सरकारसाठी फायद्याचं ठरणार आहे.