धक्कादायक! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये दिसु ‘ही’ नवी लक्षणं
18 Aug :- दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा महाभयंकर कहर वाढू लागला आहे.कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक असली तरी रोज रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक होत चालली आहे.जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांच्यात आता नवं लक्षण दिसत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही नवी लक्षणे आढळून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र दुखणं अंगावर काढू नका असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला.
ते म्हणाले, जे दुरुस्त झाले आहेत त्याना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवतो आहे ही बाब निदर्शनास येत आहे. कोरोनाच आणखी एक लक्षण दिसू लागलं आहे. पुण्यात रुग्ण दुपट होण्याचा रेट राज्यात सर्वात चांगला , पुण्यात 42 दिवसांत रुग्ण दुपट होतात, तोच दर राज्यात 30 दिवसाचा आहे. काही औषधं जर परिणामकारक नसेल तर याबाबतचा अंतिम निर्णय टास्कफोर्स ने घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्या निवासस्थान असलेल्या भागातील 200 च्या आसपास लोकांची तपासणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 7 जिलह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू दर असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्यात मुंबई 5.54 टक्के, नंदुरबार 4.48, लातूर, जळगाव 3.78, रत्नागिरी 3.59, सोलापूर 4.35, अकोला 4.25 टक्के असा दर आहे.आरोग्य विभागात भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल असंही ते म्हणाले. जिम बाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. जिम सुरू करायला हरकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. धार्मिक स्थळांबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील. मोठे धार्मिक स्थळ उघडले तर करोना चा प्रादुर्भाव वाढेल असं वाटत असंही ते म्हणाले.