बीड

कोरोना सुद्धा बरा होतोय; आज ‘129’ रुग्ण कोरोनमुक्त!

बीड जिल्ह्यातील आजवरची कोरोना स्थिती…

17 Aug :-(बीड) दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य ती ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या उच्चांकी पोहचली आहे. तब्ब्ल आज बीड जिल्ह्यातून तब्बल १२९ रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.

त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही १२४३ वर पोहोचली आहे.आजपर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण २५७१ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे.आजवर बीड जिल्ह्यातून एकूण ७५ रुगणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर रुग्णालयात दाखल झालेल्या बाधितांची संख्या १२५७ आहे.जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट ८.३% आहे.तर रिकव्हरी रेट ४८.३४ % आहे.
त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका…काळजी घ्या!