महाराष्ट्र

महाराष्ट्राचे ‘सुखद’ कोरोना अपडेट्स

17 Aug :- दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव राज्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूची भीती बाजूला ठेवून योग्य टी ‘खबरदारी’ घेतल्यास नक्कीच कोरोनाशी लढा देता येतो हे स्पष्ट होऊ लागले आहे. आज राज्यामध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढीपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या उच्चांकी आहे.

गेल्या २४ तासांमध्ये राज्यातून तब्ब्ल 11,391 रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती मिळाली आहे.त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही 4,28,514वर पोहोचली आहे. तर आज राज्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये 8,493 नव्या रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झालीय.

सोमवारी 288 रुग्णांचा मृत्यू झाला असून अत्तापर्यत मृत्यू झालेल्यांची संख्या 20,265 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या ही 1,55,268 एवढी झाली आहे.