भारत

‘या’ ठिकाणी लॉकडाऊन वाढवला!

17 Aug :- कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक कमी होण्याचे काही नाव घेत नाहीए. कोरोना विषाणूच्या जगभरातील मानवी आयुष्य विस्कळीत आणि उध्वस्त झाले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमनास आटोक्यात आणण्यासाठी देशभरात अनलॉक ३ सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचे संक्रमण अतिप्रमाणात वाढत आहे.तिथे लॉकडाउन सारखा पर्याय प्रशासन पुन्हा पुन्हा आमलात आनत आहे.

महाराष्ट्रात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अजूनही दीड लाखांवर आहे. तरीही अनलॉक आणि अंतर्गत बहुतेक सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. दुसरीकडे बिहार सरकारने मात्र 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवायचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.देशभराचा विचार केला तर कोरोनाव्हायरसचा प्रभाव सर्वाधिक असणाऱ्या पहिल्या 10 राज्यांमध्ये बिहार येतं. हे राज्य रुग्ण्संख्येच्या तुलनेत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच महाराष्ट्र आहे.

बिहारमध्ये कोरोनारुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे आहे. त्यातले 17 ऑगस्टच्या सकाळच्या आकडेवारीनुसार, 31059 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,58,705 आहे. एकूण रुग्णसंख्या तर सहा लाखांच्या जवळ पोहोचते आहे.बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने मात्र कडक उपाययोजना करत अद्याप सर्व व्यवहार खुले करण्यास नकार दिला आहे. बिहारमध्ये काही अटींवर दुकानं उघडायला परवानगी दिलेली असली, तरी शॉपिंग मॉल, थिएटर आदी बंदच आहेत.बिहारमध्ये प्रार्थनास्थळं, मंदिरंसुद्धा इतक्यात उघडणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

रेस्टॉरंटमध्येही फक्त होम डिलिव्हरीची सेवा असेल. किमान 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा नितीश कुमार सरकारचा निर्णय आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होईल, असं सांगण्यात आलं आहे. खासगी कार्यालयांमध्ये आणि कचेऱ्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असाही नियम करण्यात आला आहे.