बीड

बाप्पाची किमयाच लई न्यारी; बप्पा स्वतःच येणार दारोदारी!

बीड,  दि. १७::--जिल्ह्यात कोरोना (Covid-19 )विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यात आल्या असून या कालावधीत मूर्ती घडवणारे आणि मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघर जाऊन त्यांचे मातीचे तयार केलेले बैल,  गणेश मूर्ती विकण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये 22 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत सूट देण्यात येत आहे. तथापि बीड, गेवराई, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा, माजलगाव, धारूर, वडवणी,केज, अंबाजोगाई, परळी वै. या शहरातील अशा *विक्रेत्यांनी* आपापल्या शहरातील शासकीय रुग्णालयात दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता स्वतःची अॅन्टिजन तपासणी (Antigen Test ) करून घ्यावी असे आदेश प्रवीण धरमकर अप्पर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी हे आदेश दिले आहेत. 

ज्या विक्रेत्यांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी अॅन्टिजन तपासणी करणे शक्य होणार नाही त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी हि अॅन्टिजन तपासणी करून घ्यावी. सर्व विक्रेत्यांनी अॅन्टिजन तपासणी साठी जाताना स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे.


सर्व नागरिकांनी अशा विक्रेत्यांची Antigen Test झाली असले बाबत खात्री करूनच बैल अगर श्री गणेश मूर्ती खरेदी करावी.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार कोरोना (Covid-19 )विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि.31 ऑगस्ट,2020 रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144(1)(3) तीन रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.

या आदेशाची अवाज्ञा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने आर्थिक दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि इतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सूचित केले आहे