सिंदफणा ओव्हरफ्लो; नागरिकांनो सावध रहा!
16 Aug :- सिंदफणा प्रकल्पाच्या वरील भागामध्ये असलेले प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असल्या कारणाने शिरूर कासार तालुक्यातील सिंदफना नदीवरील सिंदफणा प्रकल्प ओव्हरफ्लोझालेला आहे,सिंदफणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे तसेच वरील प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
तालुका प्रशासनातर्फे तालुक्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावेत. नदी,ओढे
व नाल्याकाठच्या लोकांनी दक्ष रहावे.
तसेच पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.पुर पाहण्यासाठी गर्दी करून नये.जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.अचानक नदीच्या पाणीपातळीतवाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावासंपर्क क्र.
1. तहसिलदार शिरूर कासार 9823366090
2. नायब तहसिलदार 3.महसुल सहायक
7798482559, 8605835640.
असे श्रीराम बेंडे, अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती,तथा तालुका दडाधिकारी शिरूर कासार यांनी कळविले आहे