महाराष्ट्र

चार लाखाचा दरोडा!

16 Aug :- परतूर तालुक्यातील दैठणा येथे शनिवारी मध्यरात्री च्या सुमारास एका घरात चोरी झाली असून चोरट्यानी घराच्या कपाटातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यासह तीन लाख 94 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैठणा येथील विठ्ठल बाजीराव उगले हे आपल्या पत्नी- मुले व आईसह राहत असून ते 15 ऑगस्ट रोजी परिवारासह जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटाची हँगरला अडकवलेली चावीणे कपाट आणि लॉकर उघडू अज्ञात चोरट्याने रोख दोन लाख रुपये तसेच झुंबर वेल बोरमाळ नेकलेस सेवनपीस व पॅन्टच्या खिशातील रोख 54 हजार असा एकूण तीन लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. या प्रकरणी विठ्ठल बाजीराव उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. डी. पठाडे हे करीत आहे.