महाराष्ट्राचे कोरोना अपडेट!
16 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचे वाढते थैमान काही केल्या शमल्या जात नाहीए.राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे नागरिकांचे बेहाल झाले होत आहेत.आजही राज्यात नव्याने 11 हजार 111 कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर 288 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 10 हजारांच्या वरच रुग्णांची दररोज भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8836 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 70 टक्क्यांवर गेलं असून मृत्यू दर 3.36 टक्क्यांवर आला आहे. तर कोविड रुग्णांची एकूण संख्या ही 5,95,865 एवढी झाली आहे.भारतात रिकव्हरी रेट चांगला असला तरीही दर दिवसाला कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण मात्र जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 लाख 89 हजार 682 वर पोहोचला आहे.
24 तासांत तब्बल 63 हजार 489 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 944 रुग्णांचा कोरोनामुळे भारतात मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 50 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 944 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 49,980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.