सुशांत प्रकरण! म्हणून आदित्यवर संशय अधिक वाढतोय
16 Aug :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही तर मग शिवसेनेचे नेते संजय राऊत या प्रकरणावर प्रतिक्रिया का देत आहेत?, असा सवाल भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केला आहे.नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मी कधीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मीडियानेच त्यांचं नाव घेतलं आहे. सुशांतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत बोलत आहेत.
आदित्यचा याप्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत?, असा सवाल करतानाच राऊत वारंवार बोलत असल्यानेच या प्रकरणात संशय अधिक वाढला आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.