Popular News

सुखद! ‘या’ महिन्यामध्ये मिळणार भारतीयांना कोरोना लस

17 Aug :- जगभरात थैमान घालत मानवी जीवनास अडचणींच्या काळोखात लोटनारा कोरोना विषाणू दिवसेंदिवस जगभरात आपले साम्राज्य प्रस्थपित करत आहे.मात्र या महाभयंकर कोरोना संक्रमनास येसन घालण्याचे काम रशिया देशाने केल्याचा प्रबळ दावा वारंवार रशिया करत आहे. जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 130 हून अधिक लशींवर काम सुरू आहे.

कोरोना व्हायरसच्या लशीच्या स्पर्धेत रशियाने बाजी मारली आहे. मंगळवारी Sputnik V नाव असलेली कोरोनाच्या या लशीचा पहिला डोस राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलीला दिला. नोव्हेंबरपर्यंत जगभरातील देशांना कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी माहिती लशीसाठी रिसर्च फंडिंग करणाऱ्या समूहाचे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी दिली.आतापर्यंत 20 देशांनी रशियानं तयार केलेली लस खरेदी करण्यासाठी तयार झाले आहेत. भारतालाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकेल असा कयास आहे.

या लशीनं मानवी चाचणीचा तिसरा टप्पा अद्याप पूर्ण केला नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे ही लस सफल झाली आहे असं म्हणता येणार नाही असंही तज्ज्ञांनी यावेळी सांगितलं.”रशियाची ही लस जर यशस्वी ठरली तर ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे पाहावं लागेल आणि तसं असेल तर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे”, असं दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल.