सिनेमा,मनोरंजन

दिलीप कुमार यांचं घर कोरोनाच्या विळख्यात!

कोरोना विषाणूचे वाढते साम्राज्य दिवसेंदिवस मानवी जीवन विस्कळीत आणि उध्वस्त करत आहे. सर्व सामान्य नागरिकांसह अनेक अभिनेते,कलावंत,सेलिब्रेटी,खेळाडू,राजकीय नेते,प्रशाकीय अधिकारी कोरोनाच्या विळख्यात आडकले आहे. अनेक सुक्षित स्थळी कोरोनाचा शिरकाव झाला आहे.नागरिकांमध्ये कोरोनाची मोठी दहशद निर्माण झाली आहे. ९७ वर्षाचे अभिनेते दिलीप कुमार यांचं सुरक्षित घर सुद्धा कोरोनाच्या घेऱ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेते दिलीप कुमार यांचे बंधू अहसान खान आणि असलम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे.


शनिवारी रात्री त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी कोरोना उपचारांना सुरुवात केली आहे. डॉक्टर जलील पारकर आणि डॉ. निखिल गोखले हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.दिलीप कुमार यांच्या या भावांचं वयही जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना ह्रदयविकार आणि रक्तदाबाचाही त्रास आहे अशी माहिती डॉ. पारकर यांनी दिली.त्या दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आलं असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी असलम आणि अहसान हे लवकरच बरे होऊन घरी परततील अशी आशा व्यक्त केली आहे.