बीड

शिरूर पोलीसांनी लॉकडाऊन काळामध्ये साकारले बाल उद्यान,

मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या बाल उद्यानाचे आज दि 15-08-2020 रोजी 74 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून उध्दघाटन करण्यात आले. शिरूर पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात परिश्रम घेवून शिरूर शहरातील लहान मुलांसाठी विरंगुळा म्हणून तसेच वृध्दांसाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या मोकळ्या जागेत बाल उद्यान उभारण्यात आले आहे.

आरोग्यासाठी उपयुक्त होईल अशा दृष्टीकोनातून हे उद्यान बनविण्यात आले आहे. या उद्यानामध्ये लहान मूलांना खेळण्यासाठी घसरगूडी,झोके,आणि इतर साहित्य बसविण्यात आले आहे.तसेच लहान मूलांसाठी रंगरंगोटी चित्रे, वृध्दांना निवांत बसण्यासाठी कट्टे,खूा ,मनाला प्रसन्नता लाभावी यासाठी वृक्ष लागवडीसह सुसज्ज बगीचा तयार करण्यात आला आहे. या उद्यानाचा फायदा पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना व्यायाम करण्यासाठी घेवू शकतात. कर्तव्याच्या ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी हलका व्यायाम करून मन प्रसन्न करण्याची पोलीस कर्मचारी यांना उपयुक्त ठिकाण पोलीस ठाण्यास लागूनच तयार झाल्याने त्यांचा मोठा फायदा पोलीस घेवू शकतात.

सदर उध्दघाटन पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांचे हस्ते पार पडले आणि त्यानंतर हे उद्यान पोलीस वसाहत व शिरूर शहरातील बालकांसाठी खूले करण्यात आले.या उध्दघाटना वेळी पोलीस उप अधीक्षक श्री विजय लगारे,सपोनि श्री सुरेश खाडे, सपोनि श्री रामचंद्र पवार,पोलीस उपनिरीक्षक श्री.मनोज बरूरे,पोलीस ठाणे शिरूर येथील सर्व कर्मचारी हजर होते.

बीड जिल्हयात मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करुन 8 मोटार सायकल हस्तगत