Newsक्राईम

बीड जिल्हयात मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करुन 8 मोटार सायकल हस्तगत

मा.पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी बीड जिल्हयात मोटार सायकल चो-याचे प्रमाण वाढल्याने मोटार सायकल चोरी करणारे चोरांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मोटार सायकल चोरांचा शोध घेत असतांना आज दिनांक 15/08/2020 रोजी पोलीस स्टेशन शिरुर (का.) हद्यीत आवी येथे पेट्रोलींग व आरोपीची माहिती काढीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, निमगांवफाटा या ठिकाणी दोन संशयीत इसम नामे 1) साईनाथ भागवत नागरगोजे 2) किरण बबन बडे हे चोरीच्या मोटार सायकल घेवून निमगांव फाटयाकडून आरवी गावाकडे येत असल्याची माहिती मिळालेवरुन सकाळी आठ वा.चे सुमारास पथकाने सापळा लावला असता दोन इसम त्यांचे जवळील दोन मोटार सायकलवर आर्वी गावाकडे येत असतांना, त्यांच्या हालचाली संशयीत वाटल्याने त्यांना पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी थांबण्याचा इशारा केला असता ते इसम त्यांचे ताब्यातील मोटार सायकल टाकून पळून जावू लागले.

स्वतंत्र्यदिनी क्रिकेटप्रेमींना धक्का; माही,रैनाची क्रिकेटमधून Exit!

त्यांचा पाठलाग करुन दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांना नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) साईनाथ भगवान नागरगोजे वय 36 वर्षे रा.तरडगव्हाण ता.शिरुर 2) किरण बबन बडे वय 22 वर्षे रा.कोणशी ता.पाथर्डी असे सांगीतले. त्यांना त्यांचे जवळील मो.सा.चे कागदपत्रे बाबत विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी दोन्ही मोटार सायकल चोरीच्या असल्याचे सांगीतल्याने आम्ही सदर मोटार सायकलची खात्री केली असता सदर मो.सा. चोरी बाबत पो.स्टे.बीड ग्रा.ला गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले, त्यांना पुन्हा विचारपुस करता त्यांनी सांगीतले की, आम्ही व आमचा साथीदार नितीन मच्छिद्र खंडागळे रा.कोळगांव ता.शेवगांव जि.अ.नगर अशांनी मिळून एक महिण्यापासून साक्षाळपिंप्री, सिरसदेवी, सावरगांव, जि.बीड, शेवगांव, पाथर्डी जि.अ.नगर, अंबड जि.जालना, पैठण जि.औरंगाबाद इत्यादी ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्या असून आमच्या दोघांकडे आणखीन घरी (02) मोटार सायकल व आमचा साथीदार नितीन खंडागळे याचेकडे (04) मोटार सायकल असल्याचे सांगीतले.

कंगनाने केलं मोदींबाबत मोठं वक्तव्य!

नितीन खंडागळे हा त्यांच्या गावी कोळगांव ता.शेवगांव जि.अ.नगर येथे आहे असे सांगीतले. त्यावरुन पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोळगांव येथे जावून नितीन मच्छिद्र खंडागळे यास ताब्यात घेवून त्याचेकडून (04) मोटार सायकल व वरील आरोपीकडून आणखीन प्रत्येकी एक अशा एकूण (08) मोटार सायकल किं. 1,26,000/- रु.च्या मिळून आल्याने वरील तिन्ही आरोपींना पो.स्टे.बीड या गुरनं 257/2020 कलम 379 भा.दं.वि.चे गुन्हयात जप्त मुद्येमालासह पो.स्टे.ला पुढील तपासकामी हजर केले आहे. त्यांनी चोरलेल्या मो.सा. ची खात्री केली असता पो.स्टे.तलवाडा, गेवराई, पो.स्टे गोंदी जि.जालना, पो.स्टे.शेवगांव जि.अ.नगर येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरीत मो.सा.बाबत दाखल गुन्हे संदर्भाने तसेच पुढील तपास बीड ग्रा.पोलीस करीत आहेत. सदर आरोपीकडे आणखीण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री.हर्ष ए पोद्दार, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.विजय कबाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, बीड श्री.भास्कर सावंत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री.भारत राऊत, पो.उप.नि. श्री.गोविंद एकीलवाले, भास्कर केंद्रे, श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, अलीम शेख वाहन चालक संतोष हारके, अतुळ हराळे यांनी केलेली आहे.