पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे पोलीस मुख्यालय बीड येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
बीड, दि. १५ – पोलीस मुख्यालय बीड येथे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वैद्यकीय देखभाली साठी उभारण्यात आलेल्या कोविंड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले
हे वाचा- प्रकृती चिंताजनक!भारतीय क्रिकेटपटू व्हेंटिलेटरवर
याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोरमा कालावधीत जिल्ह्यातील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि कर्तव्यासाठी जनतेच्या संपर्कात यावे लागते. या कोरोना योद्ध्यांची देखभाल व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी या कोविड विलगीकरण कक्षाचा कक्षाचा उपयोग होणार आहे