स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
कोरोना महामारीच्या आपत्तीच्या छायेखाली स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असून जिल्ह्याला नागरीक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने या संकटातून बाहेर काढू — पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड, दि. १५:– कोरोना महामारीच्या आपत्तीच्या छायेखाली स्वातंत्र्य दिनाचा उत्सव दिवस साजरा करत आहोत. कोरोनाच्या संसर्गावर उपाय शोधण्यातसाठी जगातील संशोधक अथक प्रयत्न करत असताना त्याला यश मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात देखील कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला बळ देण्याची शासनाची भूमिका आहे. सर्व कोविड योद्धांच्या सुरक्षेची प्रार्थना करुन जिल्ह्याला नागरीक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने या संकटातून बाहेर काढू असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
हे वाचा- पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे पोलीस मुख्यालय बीड येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन झाला. याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.
याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली.
यावैळी बोलताना पालकमंत्री श्री.मुंडे म्हणाले, कोरोना आपत्ती बरोबर राज्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी आले या संकटांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन जनतेची संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्यासाठी सतत सज्ज आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे ही चांगली बाब आहे. येत्या गणेशोत्सव काळात दक्ष राहाणे गरजेचे असून यासाठी गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहावे असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
ते म्हणाले, या कोरोनाच्या आपत्तीमध्ये नागरीकांना दिलासा देणारी प्रक्रिया राबवली जात आहे.कोविड कक्ष स्थापनेपासून , व्हीआरडीएल प्रयोगशाळा व पहिली प्लाझ्मा थेरपी ही अत्याधुनिक यंत्रणा यासह अनेक उपायातून कोरोनाशी लढणाऱ्या अतिगंभीर रुग्णांना जीवदान मिळत आहे. विशेष मोहीमेत रॅपिड अॅंन्टिजन तपासणी कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही केली आहे. आरोग्य विभागात पदे भरण्यात येत असून या प्रक्रियाद्वारे डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी मोठ्या संख्येने नियुक्त केले जाणार आहेत.
हे वाचा- –स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी
या सर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर काही चांगल्या घटना देखील घडत आहेत त्या महत्वाच्या आहेत. देशात लॉकडाऊन करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील जवळपास दीड लाख ऊसतोड मजूर बांधव राज्यात आणि राज्याबाहेर विविध ठिकाणी अडकलेले होते त्या सर्व ऊसतोड मजूर बांधवांना त्यांच्या स्वगृही परत आणण्यात आम्हाला यश आले. हे स्थलांतर देशातील सर्वात यशस्वी स्थलांतर ठरले असे पालकमंत्री श्री मुडे म्हणाले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करण्यात यावा त्यासाठी पाठपुरावा करणार आहे असा पुनरुच्चार देखील केला. कोरोना कालावधी शासनाची लोकहिताची भूमिका असून जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकर्यांनी पिक विमा संरक्षणासाठी १७ लाख ७१ हजार विमा अर्ज नोंदणी, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या दोन लाख खात्यांवर बाराशे चोवीस कोटी रुपये जमा केले आहेत. यासह शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी शासन सतत प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले.
हे वाचा- सुखद! स्वदेशी कोरोना लशीची मानव चाचणी सफल
इथल्या तरुणांना इथेच रोजगार उपलब्ध होतील, उच्च शिक्षणापासून ते वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या शहरात जायची गरज थांबावी, जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजुरांचे जीवनमान उंचावून त्यांची कौटुंबिक व आर्थिक प्रगती व्हावी, विकसित जिल्ह्यांच्या यादीत अग्रस्थानी नेण्यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करु असा विश्वास मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित न्यायाधिश व शहीद कुटुंबीय, उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन पालक मंत्री श्री मुंडे यांनी सदिच्छा दिल्या
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान
ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत नाळवंडी ला प्रथम क्रमांकाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सरपंच राधाकृष्ण म्हेत्रे , ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ यांनी स्विकारला तसेच द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन ग्रामपंचायत सांडरवनचे सरपंच पांढुरंग धारकर व ग्रामसेवक सत्यभान काशीद यांचा प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.