भारत

‘या’ देशामध्ये मोदींसाठी तयार झालं विशेष विमान!

15 Aug :- भारत देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ भारतामध्येच नाहीतर जगभरात सर्वत्र आहे.एक काळ होता की अमेरिका हा देश नरेंद्र मोदींना अमेरिकेत येण्याकरिता परवाना देत नव्हता.मात्र आज नरेंद्र मोदींमधील सक्षम असणारी नेतृत्वगुण आणि त्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या विदेश प्रवासासाठी एक अत्याधुनिक विमान तयार झालं आहे. ‘Air India One’ असं या विमानाचं नाव असल्याची माहिती सांगितली जात आहे.

हे वाचा- –स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी

अमेरिकेत हे विमान तयार झालं असून लवकरच ते भारतात येणार आहे. हे विमान आणण्यासाठी Air India, Indian Air Force आणि सुरक्षा संस्थांचे अधिकारी अमेरिकेला रवाना झाल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. VVIPच्या विदेश प्रवासासाठी खास या विमानाची निर्मिती करण्यात आली असून अत्याधुनिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे विमान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.Boeing-777 ER या विमानाच्या सर्व चाचण्या अमेरिकेत झाल्या आहेत.

हे वाचा- राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी, तयार झाले दोन गट!

आता भारतीय अधिकारी त्याची तपासणी करतील आणि ते विमान भारतात आणलं जाणार आहे. सध्या पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी जे विमान वापरलं जातं ते जुनं झालं आहे.त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष वापरतात त्या Air Force Oneच्या धर्तीवरच भारतासाठीही बोइंगने हे विमान तयार करून दिलं आहे. या विमानाची बांधणी आणि अंतर्गत सजावट खास आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या विमानाची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. आकाशातून व्हिडीओ आणि ऑडिओच्या माध्यमातून पंतप्रधान कुठेही संवाद साधू शकतात अशी सोय या विमानात आहे. पंतप्रधानांसाठी कार्यालय, बैठकांसाठी खोली, इतर अधिकाऱ्यांसाठी मोकळी जाग आणि राहण्याची स्वतंत्र सोय यात आहे.