महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट! वाचा सविस्तर..

14 Aug:- राज्यामध्ये सर्वत्रच कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे. कोरोनाच्या या थैमानाला आटोक्यात आणण्याकरिता अनेक अक्कल-युक्त्या लढवल्या जात अनंत मात्र कोरोनाचे वाढते थैमान शमल्या काही जात नाही. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक असली तरीही राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग दररोज वाढत आहे ही दिलासादायक बाब आहे.

आज 12,608 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 364 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 5,72,734 एवढी झालीय तर मृत्यू संख्या 19,427वर पोहचली आहे. आज 10,484 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात 1,51,555 Active रुग्ण आहेत. तर 4,01,442 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.