Popular News

रशियन कोरोना लशी बाबत W.H.O. चा गौपयस्पोट!

15 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीचे जीवन विस्कळीत आणि उद्धवस्त करून टाकले आहे.जभरातील देशांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे कोरोना विषाणूने मोडले आहे. सर्व सामन्यांच्या बेहाल झाले असून एक वेळेसच्या भाकरीसाठी देखील सामान्य माणूस मौताज झाला आहे. अशा भयाण अवस्थेमध्ये आयुष्य पुढे चालवण्याकरिता जगभरातील नागरिक सध्या केवळ आणि केवळ कोरोनावर मात करेल अशा प्रभावी लशींच्या प्रतीक्षेत आहेत.कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लास तयार करण्याचे काम जगभरात युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देश कोरोवर लस बनवत आहेत.मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. कारण संपूर्ण जग ज्या दिवसाकडे डोळे लावून बसलं होतं, तो दिवस अखेर आलाच. रशियाने कोरोना लस तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली.

इतकंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं.लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आहे.दोन आठवड्यांत रशियन कोरोना लशीची पहिली बॅच तयार होणार आहे. 20 पेक्षा अधिक देशांकडून रशियन लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती रशियाने दिली आहे.दरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोठा गाजावाजा करत कोरोना विषाणूवरील लस लॉन्च केली. मात्र रशियाच्या या दाव्यांवर जागतिक आरोग्य संघटनेला संशय असून यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

रशियाने लॉन्च केलेल्या लसीची ऍडव्हान्स स्टेजमध्ये चाचणी घेण्यात आली अथवा नाही यावर डब्ल्यूएचओला संशय आहे.रशियाने जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारे चाचणी केली नाही, त्यामुळे ही लस धोकादायक ठरू शकते, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.रशियाने लस विकसित करताना, चाचणी करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निर्देशांचे, सूचनांचे पालन केले नाही.

कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत असेल तर हे धोकादायक असल्याचेही डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अनेकदा संशोधकांकडून लस विकसित झाल्याचा दावा करण्यात येतो. ही खरंतर आनंदाची बातमी असते. मात्र, लस प्रभावी असल्याचे संकेत मिळणे आणि क्लिनिकल चाचणीच्या सर्व टप्प्यांमधून लसीची चाचणी करणे यामध्ये फरक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले.तसेच डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड यांनी सांगितले की, रशियाने विकसित केलेल्या लसीबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेऊ शकलेलो नाही, कारण याबाबत आमच्याकडे आवश्यक माहिती नाही.

सध्या रशियासोबत याबाबत चर्चा सुरू असून कोरोना लस, चाचणी आणि पुढील पावलाबाबत माहिती घेतली जात आहे. यासह युरोपचे प्रसिद्ध संशोधक इसाबेल इमबर्ट यांनी घाईघाईने महामारीचा उपाय शोधण्याचा प्रयत्न अंगावर येऊ शकतो, असे म्हटले. अमेरिकेचे रोग विशेषज्ञ एंथन फाउची यांनीही यावर संशय व्यक्त केला आहे.


याआधी रशियाचे राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लसीची नोंदणी करण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच ही लस आपल्या दोन्ही मुलींनीही घेतली असल्याचे पुतीन यांनी सांगितले होते. मात्र तेव्हापासून यावर संशय व्यक्त केला जात आहे.