बीड

ऑनलाईन कृष्णरुप सज्जास्पर्धेत प्रभंजन वैद्य प्रथम!

बीड –
14 Aug :- चिरंजीव प्रभंजन प्रेरक वैद्य, इयत्ता दुसरी, संस्कार विद्यालय, बीडच्या गुणवंत बालकलाकाराने संस्कार भारती बीड आयोजित ऑनलाइन कृष्णरुप सज्जा स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आपल्या पंचवीस सेकंदाच्या व्हिडिओ चित्रीकरणामध्ये चिरंजीव प्रभंजने कोरोणा वैश्विक आपत्तीवर अत्यंत प्रभावी लक्षवेधी सामाजिक संदेशावर अभिनय सादर करून हे सुयश प्राप्त केले.

कुमारी देवयानी प्रेरक वैद्यने प्रभंजन सोबत धनुर्धारी अर्जुनाची अर्थात पार्था ची भूमिका सक्षम पणे निभावली व उभयतांच्या कलाविष्कारातून प्रथम क्रमांकाचे सुयश प्राप्त झाले.या सुयशाच्या यशस्वीतेसाठी प्रभंजनची आई सौ मीरा वैद्य ,बहिण कल्याणी व शिवानी वैद्य यांचे मौलिक परिश्रम कामी आले व हे नेत्र दिपक सुयश साकार झाले.

९८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला . ० ते ७ वर्षाच्या बालगोपाळांसाठी हि स्पर्धा घेण्यात आली.
संस्कार भारती बीडच्या वतीने १२ऑगस्ट२०२० रोजी गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून “ऑनलाईन कृष्णरुप सज्जा स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवर हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून व फोन करून चिरंजीव प्रभंजन व वैद्य परिवाराचे अभिष्टचिंतन केले.