Popular News

आता मिळणार अवघ्या 20 मिनिटांमध्ये कोरोनाचा रिपोर्ट!

14 Aug :- जगभरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आणि डोक्यात दहशद निर्माण करून थैमान घालणारा कोरोना विषाणू दिवसेंदिवस मानवी आयुष्य विस्कळीत आणि धव्स्त करून टाकत आहे. कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरु आहे. मात्र त्याला अजुनही पाहिजे तसं यश आलेलं नाही. त्यात मोठी प्रगती झालेली आहे. पण पूर्ण यश मिळायला आणखी काही वर्ष महिने जातील असं बोललं जात आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयीत रुग्णांची तातडीने टेस्ट करून त्यांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न सगळेच देश करत आहेत.

त्यासाठी तातडीने टेस्ट करणं आणि त्याचा निकाल येणं गरजेचं आहे.ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न युनिव्हर्सिटीने यावर संशोधन करून एक प्रणाली विकसित केली आहे. त्याचे अत्यंत चांगले परिणाम आले असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.या चाचणीसाठी अतिशय कमी साधनांची गरज असते आणि फक्त 20 मिनिटांमध्ये त्याचा रिझल्टही येतो. हा रिझल्ट हा 100 टक्के खात्रिचा असल्याची माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

फक्त दोन ते तीन साधनांमध्ये ही किट तयार होत असल्याने ती सगळीकडे नेता येतं. त्यामुळे चाचणी करायला सोपं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं.जगातल्या अनेक देशांमध्ये सध्या कोरोना टेस्ट किट्सची कमतरता आहे. त्यामुळे या नव्या संशोधनामुळे त्या देशांना फायदा होऊ शकतो.