बीड

‘या’ मुळेच झाला कोरोनाचा प्रसार!

14 Aug :- जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुक्त संचार करता येत नसल्यामुळे सर्व सामन्यांच्या हाताला काम नसल्याने नागरिकांचे बेहाल झाले आहे.कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता रशिया देशाने प्रभावी लास बनवली आहे.मात्र वारंवार WHO प्रश्नउपस्थित करत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत संतापले आहेत.

राऊत म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या नादाला लागूनच जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे’, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. रशियात कोरोनाची लस आली. त्याच्याही WHO विरोधात बोलली. पण तरीही पुतीन यांनी मुलीला लस टोचलीच, असंही राऊत म्हणाले.


राऊत यांची WHO विरोधातली मल्लिनाथी चर्चेचा विषय ठरत आहे, कारण अगदी काही दिवसांपूर्वी सामनासाठी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतही राऊत यांनी WHO चा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता.मुख्यमंत्र्यांना आरोग्याविषयी असलेल्या माहितीबद्दल कौतुक करत त्यांनी WHO लाही सल्ला घ्यावासा वाटेल असं ज्ञान असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं.