राजकारण

‘ती’ वीरपत्नी देणार धनंजय मुंडेंच्या गाडीखाली जीव!

14 Aug :- मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात दिली असतानाही त्यांच्या फाइलवर अद्याप सहीच झालेली नाही. अधिकारी कुठे ही सहकार्य करत नाहीत. उलट उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची खंत भाग्यश्री यांनी व्यक्त केली.पाटोदा तालुक्यातील शहीद जवान तुकाराम राख यांना 2010 मधील ऑपरेशन रक्षकमध्ये वीरमरण आले.

पती गेल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही वीरपत्नी भाग्यश्री कुटूंबाचा गाडा चालवतच राहिल्या. शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. धनंजय मुंडे यांनी 8 दिवसात जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. याला आता आठ महिने झाले. मात्र जमीन अद्याप मिळालेली नाही, म्हणून आता धनंजय मुंडे यांच्या गाडी खाली जीव देण्याचा असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन देऊनही अद्यापही न्याय मिळाला नाही. यामुळे स्वातंत्र्यदिनी त्यांच्याच गाडीखाली जीव देण्याचा शहीद वीरपत्नी भाग्यश्री राख यांनी इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी 8 दिवसांत जमीन मिळेल असे आश्वासन राख यांना दिले होते. मात्र आश्वासन देऊन 8 महिने उलटून गेले. तरीही अजूनही मला न्याय मिळालेला नाही. शहिदांच्या वारसांना दोन हेक्टर जमीन देण्यात यावी असा शासन निर्णय असतानाही बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील लालफितीच्या कारभारामुळे भाग्यश्रींनी आता टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अशा स्वरूपाचे पत्रही त्यांनी दिले आहे.