भारत

मोटा भाई झाले कोरोनामुक्त!

14 Aug :- कोरोना विषाणुचे थैमान देशभरात सुरु आहे.मात्र दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जरी चिंताजनक असलात तरी दिवसाखेर रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रामण नागरिकांना सुखावणारे आहे.आताच हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. शहा यांनीच ट्विटरवर ही माहिती देत डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याला योग्य प्रतिसादही मिळत असल्याने ते कोरोना मुक्त झाले आहेत. डॉक्टर्स, कुटुंबीय आणि चाहत्यांच्या सदिच्छेमुळेच आपण लवकर बरे झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता होम क्वारंटाइनमध्ये काही दिवस राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रातल्या काही मंत्र्यांना गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असून सगळ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.