राजकारण

पवार कुटुंबायांची बैठक; परिवारास एकत्र ठेवण्यासाठीचा अंतिम प्रयत्न!

14 Aug :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा श्री. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्या मागणीला जाहीरपणे फटकारल्या नंतर क्युबमध्ये नाराजी पसरल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं. पण हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीत एकत्र भेटणार असल्याची माहिती मिळते आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

खरंतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे यावेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला वाद श्रीनिवास पवारच सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.