14 Aug :- जगभरात आपले साम्राज्य स्थापित करणाऱ्या कोरोना विषाणूमध्ये आता दिवसेंदिवस बदल घडून येत आहेत.सध्य परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूमध्ये खूप प्रमाणात बदल घडून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वैज्ञानिकांनी हवेत कोरोना विषाणूच्या अस्तित्वाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. मात्र कोणीही असे म्हटले नाही की हवेमध्ये असलेले जेनेटिक मटेरियलसह व्हायरस जिवंत राहतो.दुसरीकडे, फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांकडून सात ते 16 फूट अंतरावर एरोसॉल्समधील जिवंत व्हायरस अलग ठेवण्यात यश आले आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमात बदल करण्याचे सुचविले आहे.
व्हायरसोलॉजिस्ट डॉ. जॉन लेडनिकी यांचे म्हणणे आहे की ज्या खोलीत व्हायरस आयसोलेट केला आहे त्या खोलीत दर तासाला सहा वेळा हवा बदलली जाते. असे असूनही, एक लिटर हवेत व्हायरसचे 74 कण सापडले. जेथे वेंटिलेशन केले जात नाही, तेथे हवेत मोठ्या प्रमाणात व्हायरस आढळू शकतात.फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या शेन्ड्स हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना रूग्णांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातील एका खोलीतून हे नमुने वेगळे केले आहेत.
व्हायरस पकडण्यासाठी दोन सॅम्पलर वापरले. त्यापैकी एका रुग्णापासून सात फूट दूर आणि दुसरे 16 फूट अंतर ठेवले होते. दोन्ही सॅम्पलरमध्ये व्हायरस आढळले जे पेशींना संक्रमित करण्यास पूर्णपणे सक्षम होते.त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांत बदल होऊ शकते. सध्या 6 फूटांचे अंतर ठेवण्याचा नियम आहे. मात्र आता 16 फूटपर्यंत अंतर बाळगणे गरजेचे ठरू शकते.
Related