News

मा.प्राचार्य पी.बी.सावंत सर यांचे निधन


बीड, दि.१४: – बलभिम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पांडुरंग बाबूराव सावंत ( पी.बी.सावंत) यांचे अल्पशा अजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सुना असा परिवार आहे. काकु नाना हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालाजी जाधव यांचे ते सासरे होते.

त्याचा अंत्यविधी अमरधाम, मोंढा रोड येथे सायं. ४ वा. करण्यात येणार आहे. पी.बी.सावंत सरांना झुंजार नेता परीवाराकडून भावपुर्ण श्रध्दांजली.

पांडूरंग बाबुराव सावंत सरांचे मुळ गाव आहेरचिंचोली हे असुन सावंत सरांनी प्राचर्य – बलभीम महाविद्यालय, बीड, माजलगाव महाविद्यालय, माजलगाव, अहम!दपूर महाविद्यालय येथे सेवा दिलेली आहे. या तिनही महाविद्यालयाच्या इमारती त्यांच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या.

शिक्षण व विचारप्रसाराचे कार्य केले त्यानी जिवनभर कार्य केले. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठे योगदान सरांचे आहे.

मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकाळही त्यांनी यशस्वी रित्या पुर्ण करुन समाज मनामध्ये मोठे स्थन निर्मान केले.

विचाराशी बांधील असलेल्या प्राचार्य पी. बी. सावंत सर यांनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून जीवन जगले.