News

बीड – 67 रुग्ण पॉझिटिव्ह!

बीड जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाचा वाढता उद्रेक बीड जिल्हा प्रशासनाची आणि नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. दररोज येणाऱ्या धक्कादायक अहवालामुळे बीड जिल्हावासियांचे दैनदिन जीवन पार विस्कळीत होऊन गेले आहे.बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागात कोरोनाचे साम्राज्य स्थापित झाले आहे. यामुळे नागरिकांना मुक्त संचार करणे देखील कठीण झाले आहे.कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी चिंताजनक वाढत असली तरी बीड जिल्हावासियांकरिता एकमेव दिलासादायक बाब अशी आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.आताच आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यामध्ये एकूण 67 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.