महाराष्ट्रराजकारण

पार्थ पवारांच्या नाराजी बाबद जयंत पाटीलांनी केला मोठा खुलासा!

13 Aug :- पार्थ पवारांनी केलेल्या मागणी बाबद आजोबा शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर राज्यात सर्वत्रच अनेक प्रकारच्या चर्चेस उद्धण आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या होत्या. आजोबांनी जाहीरपणे कानउघडणी केल्यानंतर पार्थ पवार पहिल्यांदाच आजोबांच्या भेटीसाठी देखील गेलेले आहेत. पार्थ पवार आजोबा शरद पवारांवर नाराज असल्याची देखील माहिती समोर येत होती. पार्थ पवारांच्या नाराजीवर मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे.

पार्थ पवार आणि त्यांचे अजित पवार नाराज नाहीत. शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना बोलण्याचा अधिकार आहे. कुटुंबातील कोणी वडिलधारी व्यक्ती काही बोलली तर आपण नाराज होतो का?,’ असा प्रश्न जयंत पाटील यांनी करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.दरम्यान, पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळं लवकरच या वादावर पडदा पडणार असल्याचं शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. तर, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली.