महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

13 Aug :- राज्यात सर्वत्रच कोरोनाचा महाभंकर उद्रेक सुरु आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढतच आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान विस्कळीत आणि उध्वस्त झाले आहे.राज्यात आज पहिल्यांदाच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

राज्यात नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. राज्यात आज नऊ हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.राज्यात आज दहा लाख 25 हजार 660 व्यक्ती घरात विलगीकर मध्ये आहेत, तर 36 हजार 450 संस्थात्मक विलगीकरण आहेत.

राज्यात एकूण एक लाख 49 हजार 798 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 23 लाख 96 हजार 638 झाला आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 66 हजार 999 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ही सर्वाधिक रुग्णांची आकडेवारी आहे.

याआधी 8 ऑगस्ट रोजी 65 हजार 156 नवी रुग्ण सापडले होते. तर, एका दिवसात 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 6 लाख 53 हजार 622 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 47 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.