क्रीडा

आणि थै …थै नाचू लागली फिरकीपटूची होणारी बायको!

13 Aug :- जगभरामध्ये आपल्या जादुई फिरकी गोलनंदाजीमुळे अल्पवधीतच लोकप्रिय झालेला भारतीय क्रिकेट संघातील एकहाती सामना जिंकवणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा नुकत्याच काही दिवसांपूर्वी डान्स कोरिओग्राफर असणाऱ्या धनश्री वर्मा सोबत साखरपुडा पार पडला.जगभरात चाहलची लोकप्रियता असामान्य आहे.साहजिकच चहलसह साखरपुडा झाल्यानंतर ती धनश्री वर्मा अधिकच चर्चेत आली.

धनश्री वर्माचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मात्र यावेळी धनश्री एक डान्स व्हिडिओ झाल्यामुळे विशेष चर्चेत आली आहे.धनश्रीने नुकत्याच केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्यामध्ये धनश्री पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचू लागली आहे.धनश्री आपल्या सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. आता शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करते आहे.

पीपीई सूट घालून तिनं कुर्ता पजामा या पंजाबी गाण्यावर ठेका धरला आहे. धनश्रीने एअरपोर्टवरच हा डान्स केला आहे. विमानतळाच्या वेटिंग लाऊंजमध्ये तिनं आपल्या डान्सचा व्हिडीओ शूट केला आहे.धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा नावाची तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा बॉलिवूड गाण्यांवर डान्स करते. याशिवाय तिने हिपहॉपचं प्रशिक्षणही घेतलं आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला 1.5 मिलिअन सबस्क्रायबर आहे. आपल्या चॅनेलवर तिने असे बरेच व्हिडीओ याआधी शेअर केले आहेत