बीड

बीड जिल्ह्यातून 74 रुग्णांना भेटली कोरोनमुक्तीची पावती!

13 Aug :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जिल्ह्यातील ५ शहरात १० दिवसांची संचारबंदी लागू केली आहे.बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आलेख बीड प्रशासनाची आणि नागरिकांचे डोकेदुखी बनला आहे.मात्र बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे बीड जिल्ह्यातील रुग्ण कोरोना सारख्या रोगावर मात करून बरे होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आज पुन्हा 74 बाधितांना कोरोनापासून मुक्ती मिळाली असून आज ते आपल्या घरीजाणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 59 बाधितांचा मृत्यू झालेला उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत 917बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी सध्या 1276 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 13 तासात अंबाजोगाईत सात रुग्णांचा मृत्यू झला होता. तोचपुन्हा अंबाजोगाईत आणखी एका बाधिताचा मृत्यू झाला असल्याने अंबाजोगाईतमयतांची संख्या 9 वर पोहचली आहे.

एकंदरीत लॉकडाऊन असल्याने काही प्रमाणात बाधित रुग्ण कमी येत असले तरी बाधितांची ही साखळी तुटणे आवश्यक आहे.बुधवारी 115 बाधित आल्यानंतर बीड तालुक्यातील 40 जणांचा या बाधितांमध्ये समावेश आहे. अँटीजेन तपासणीनंतर काही प्रमाणात रुग्ण आढळूनआल्याने आता संसर्गाची भीती काही प्रमाणात कमी होणार यात काही शंका नाही.परंतु ही अँटीजेन तपासणी फक्त बीड शहरापुरती न राबविता इतर तालुक्यातीलशहरी ठिकाणी अँटीजेन तपासणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

तसेच सध्यारुग्णालयातून डिस्चार्ज होणारे व बाधित म्हणून रुग्णालयात दाखल होणारेयात दाखल होणार्‍यांची संख्या जास्त असल्याने जिल्हा रुग्णालय व इतर सीसी सेंटर हाऊसफुल झालेले आहेत. तसेच नवीन क्वॉरंटाईन सेंटरही आरोग्य प्रशासन ताब्यात घेऊन लवकरच त्या क्वॉरंटाईन सेंटरलाही कोविड सेंटर म्हणून घोषित करणार आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना उपचार देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी हॉस्पिटल सुरू करू नये म्हणून विरोध केला होता,परंतु कोणत्याच शर्थी, अटींना मान्यता नसल्याने लोटस् रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून अखेर सुरू झाले आहे.