भारत

धक्कादायक! पंतप्रधान मोदींसोबत असणाऱ्या ‘या’ व्यक्तीला झाली कोरोनाची लागण

13 Aug :- कोरोनाचे वाढते थैमान दिवसेंदिवस संपूर्ण मानव जातीवर एकापाठोपाठ आघात करत आहे.सर्व सामान्यांसह अनेक मोठे सेलिब्रेटी,अभिनेते,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी सुरक्षित स्थळी असताना सुद्धा कोरोनाच्या घेऱ्यात आले आहेत.आताच हाती आलेल्या माहितीनुसार राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाळ दास यांची अचानक प्रकृती खालवल्याची माहिती मिळाली आहे. जन्माष्टमीनिमित्तानं मथुरा इथे ते कार्यक्रमासाठी आले असताना अचानक त्यांना त्रास होऊ लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वसनाचा त्रास झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

महंत नित्य गोपाळ दास यांच्या प्रकृी नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांच्या टीमनं दिली आहे. त्यांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा कोरोनाचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भूमिपूजनासाठी महंत नित्य गोपाळ दासही उपस्थित होते. 7 दिवसांनंतर आता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.दरवर्षीप्रमाणे महंत नित्य गोपाळ दास जन्माष्टमीनिमित्तानं मथुरेत आले होते.

सोहळ्यादरम्यान त्यांना अचानक श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यांनी तातडीनं डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं. प्रकृती बिघडल्यानंतर तातडीनं सीताराम आश्रमात दाखल करण्यात आलं. तिथे कोरोनाची चाचणी करणारी टीमही पोहोचली. महंत नृत्य गोपाळ दास यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.