नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक;तात्काळ मुंबईला रवाना!
13 Aug :- खासदार नवनीत राणा यांच्यावर कोरोना विषाणूचा चांगलाच प्रादुर्भाव झाला आहे. आगोदर कुटुंबातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निवडण झाले.नंतर नवनीत राणा यांची मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल समोर आला. आणि मग लागलीच पतीसह स्वतः नवनीत राणा कोरोनाच्या घेऱ्यात आल्या.खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यानच्यावर उपचार सुरु करण्यात आली.मात्र नवनीत राणा यांच्या तब्बेत जास्त बिघडल्या कारणाने त्यांना मुंबईला रावण करण्यात आले आहे.
खासदार नवनीत राणा यांना नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.आमदार रवी राणादेखील त्यांच्यासोबत मुंबईत येणार आहेत. कोरोना झाल्याने नवनीत राणा नागपुरात उपचार घेत होत्या. आता त्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आहेत. श्वास घ्यायला त्रास होत असून नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखतं असल्याची माहिती मिळत आहेत.नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंताही वाढली आहे.
नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला.
राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावरगेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केले होते.