बीड

मोठी बातमी! काँग्रेसच्या ‘या’6 आमदारांनी अध्यक्षांकडे दिले राजीनामे

13 Aug :- सतत भाजपावर टिका करणाऱ्या कांग्रेस पक्षाला आता आपल्या पक्षातिल लोकांना आवरने आणि जवळ करने गरजेचे आहे.सतत एका पाठोपाठ कांग्रेसला धक्के मिळत आहे.या गोष्टीकडे कांग्रेसला लक्ष्य देनेच हितकारक ठरणार आहे.राजस्तानमध्ये सचिन पायलट यांचे मन वळविण्यात आणि गेहलोत सरकार वाचविण्यात काँग्रेसला यश आले आहे!

मात्र, मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे.आमदार ओ हेन्री सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली.हेनरी सिंह यांच्यासमवेत ओइनम लुखोई, मोहम्मद अब्दुल नासीर, पोनम ब्रोजन, नगमथांग होकिप, गिनसुआनहू यांनी राजीनामा दिला आहे.

या सर्वांनी पक्षाने बजावलेल्या व्हिपचे उल्लंघन करत सोमवारी एका दिवसासाठी बोलाविलेल्या विधानसभा अधिवेशनाकडे पाठ फिरवली होती.त्यांच्याव्यतिरिक्त अन्य दोन काँग्रेस आमदारांनीही दांडी मारली होती.त्यामुळे भाजपचे नीत एन बीरेन सिंह सरकार तरले.

यासंदर्भात सिंह म्हणाले, सोमवारी रात्री आम्ही विधानसभा अध्यक्ष युमनम खेमचंद सिंह यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. आम्ही लवकरच पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहोत.