महाराष्ट्र

सरकारने तात्काळ ‘हा’ निर्णय न घेतल्यास अंबेडकर छेड़नार तीव्र आंदोलन!

13 Aug :- सिताबर्डीच्या मोर भवनसमोर डफली वाजवून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बस वाहतूक सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. याबाबत १५ aug पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला.

यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरोनाची लागण झाली. १० दिवसापूर्वी केंद्राने सादर केलेल्या रिपोर्टनुसार ८० टक्के रुग्णांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज निर्माण झाल्यात. त्यामुळे त्यांना कोरोना लागण होणार नाही. उरलेल्या २० पैकी १५ टक्क्यांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज निर्माण होत आहेत. ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस का धरले जात आहे.