आजोबांनी क़ानउघडनी केल्यानंतर पार्थ पवारांनी दिली प्रतिक्रिया!
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होत. बुधवारी सकाळी पवारांनी जाहीरपणे ही कानउघडणी केली होती.अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे’ अशा कठोर शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली होती.
आजोबांनी क़ानउघडनी केल्यानंतर पार्थ पवारांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे
“त्यावर पार्थ पवार यांनी आपल्या आजोबांच्या वक्तव्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नसल्याचे म्हटले आहे.”