Popular News

धक्कादायक! ‘या’ वयातील लोकांना नाही देता येणार कोरोना लस!

13 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीचे जीवन विस्कळीत आणि उद्धवस्त करून टाकले आहे.जभरातील देशांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे कोरोना विषाणूने मोडले आहे. सर्व सामन्यांच्या बेहाल झाले असून एक वेळेसच्या भाकरीसाठी देखील सामान्य माणूस मौताज झाला आहे. अशा भयाण अवस्थेमध्ये आयुष्य पुढे चालवण्याकरिता जगभरातील नागरिक सध्या केवळ आणि केवळ कोरोनावर मात करेल अशा प्रभावी लशींच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लास तयार करण्याचे काम जगभरात युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देश कोरोवर लास बनवत आहेत.मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. कारण संपूर्ण जग ज्या दिवसाकडे डोळे लावून बसलं होतं, तो दिवस अखेर आलाच. रशियाने कोरोना लस तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली. इतकंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं.लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आहे.मात्र – 18 वर्षाखालील आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना रशियन कोरोना लस लागू करण्याची परवानगी नाही. असा दावा Fontanka न्यूज एजन्सीच्या अहवालात करण्यात आला आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनाही लस दिली जाणार नाही. Fontanka न्यूज एजन्सीने रशियातील सरकारी कागदपत्रांच्या आधारे प्रकाशित अहवालात म्हटले आहे की 18 वर्षांपेक्षा कमी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाणार नाही कारण सध्या या लोकांवर काय परिणाम होईल याची पूर्ण माहिती नाही. म्हणजेच, याचा अजून अभ्यास झालेला नाही.

मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले होते की रशियाने यशस्वी कोरोना लस तयार केली आहे.परंतु जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे कारण रशियन कोरोना लसीची फेज -3 चाचणी झालेली नाही. ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही, यासाठी जगभरातील तज्ञ फेज-3 चाचणीला महत्त्व देतात. डब्ल्यूएचओचे असेही म्हणणे आहे की फेज-2 आणि फेज-3 चाचणीनंतरच लसीचे यश किंवा अपयश हे समजू शकते.

स्वतः रशियाचे म्हणणे आहे की सौदी अरेबिया, युएई, ब्राझील, मेक्सिको आणि रशियामध्ये 12 ऑगस्टपासून त्यांच्या लसीची फेज -3 चाचणी सुरू होत आहे. फेज-3 चाचणीत 2000 लोकांचा सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. sputnikvaccine.com च्या म्हणण्यानुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन नियमांनुसार पहिल्या आणि दुसर्‍या चाचण्यांच्या आधारे 11 ऑगस्ट रोजी या लसीला मान्यता दिली. पण पुतीन म्हणाले की लसीच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत.

रशियाच्या कोरोना लसीची इतर औषधांसह काय रिअ‍ॅक्शन होईल, याबाबत देखील सध्या कोणताही अभ्यास झालेला नाही. रशियाच्या गामलेया इंस्टीट्यूटचे म्हणणे आहे की कायदेशीररित्या मुलांवर लसीची चाचणी घेण्यापूर्वी बरेच पेपर्स सादर करावे लागतात. ते म्हणाले की नोंदणीनंतर आता आम्ही ते सुरू करणार आहोत.