बीड

धक्कादायक! IPL रोमांच सुरू होण्यापूर्वीच निघाला ‘या’ संघात कोरोना रुग्ण

  कोरोनाचे वाढते थैमान दिवसेंदिवस संपूर्ण मानव जातीवर एकापाठोपाठ आघात करत आहे.सर्व सामान्यांसह अनेक मोठे सेलिब्रेटी,अभिनेते,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी सुरक्षित स्थळी असताना सुद्धा कोरोनाच्या घेऱ्यात आले आले आहेत.काही दिवसांपूर्वीच भारतातील लोकप्रिय असणारे  IPL चे १३ वे सीजन होणार असल्याचे जाहीर झाले आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेट खेळाडूंनी कसून सराव करण्यास सुरवात देखील केली आहे.मात्र   IPLचा रोमांचक हंगाम सुरु होण्यापूर्वीच धक्कादाय माहिती समोर आली आहे. आयपीएल स्पर्धा अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयनं ही स्पर्धा युएइमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्स संघाचा फिल्डिंग कोच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली, यात फिल्डिंग कोट दिशांत त्यागनिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तर, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याबाबत राजस्थान रॉयल्स संघाने पोस्ट करत माहिती दिली आहे.दरम्यान, कोरोनाच्या काळात युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे. बीसीसीआयनं यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे. लवकरच सर्व खेळाडूंना ही नियमावली पाठवण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार बायोसेफ्टी सुरक्षा खेळाडूंना पुरवण्यात येणार आहे. या अंतर्गत खेळाडू कोणतेही नियम मोडू शकत नाही. तसेच, खेळाडू आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवू शकतात की नाही, याबाबत विचार सुरू आहे.