महाराष्ट्र

…यामुळे आमदारांनीच केली महिलेची प्रसूती!

12 Aug :- कोरोनारूपी मोठे संकट सध्य परिस्थितीमध्ये मानवी आयुष्याशी खेळते आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. कोरोना विषाणूने मानवी आयुष्य उध्वस्त आणि विस्कळीत करून ठेवले आहे.कोरोनाच्या वाढत्या कहारामुळे माणसांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा भयानक परिस्थितीत मिझोराममध्ये आमदाराकडून विराट माणुसकीच दर्शन घडून आले. मिझोराममधील आमदार आपल्या चम्पाई या भागात भूकंपानंतरचा दौरा करण्यासाठी गेले होते. तेथे एका गर्भवती महिलेला प्रसूती करण्यासाठी तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती.

यावेळी जिल्हा रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याचे आमदारांना सांगण्यात आले. आमदार स्वत: व्यवसायाने डॉक्टर असून गायनोक्लॉजीचे तज्ज्ञ आहेच. सकाळी आमदारांना याबाबतची माहिती देण्यात आली. महिला अत्यंत छोट्या गावात राहते. प्रसवकळा सुरू झाल्याने तिला त्रास असह्य होत होता. तिच्या प्रकृती नाजूक होत चालली होती. त्यात तिला रक्तस्त्रावही सुरू झाला होता आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण खालावलं होतं, आमदारांना याबाबतची माहिती दिली. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अशात जिल्हा रुग्णालयाती डॉक्टर प्रकृती चांगली नसल्याने उपलब्ध नव्हते आणि दुसरं रुग्णालय तेथून 200 किमी लांब होतं. अशावेळी आमदारांनी अजिबात वेळ न दवडता स्वत: महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर मी सकाळी जिल्हा रुग्णालयात पोहोचलो आणि 9.30 वाजता शस्त्रक्रिया केला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून बाळ आणि आईची प्रकृती चांगली आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच या आमदारांनी मदत केली नाही, तर यापूर्वीही डॉक्टरी नंतर राजकीय क्षेत्रात दाखल झालेल्या आमदारांनी एक गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करुन दिली.