Popular News

‘या’ आठवड्यात मिळणार रशियन कोरोना लस!

12 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीचे जीवन विस्कळीत आणि उद्धवस्त करून टाकले आहे.जभरातील देशांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे कोरोना विषाणूने मोडले आहे. सर्व सामन्यांच्या बेहाल झाले असून एक वेळेसच्या भाकरीसाठी देखील सामान्य माणूस मौताज झाला आहे. अशा भयाण अवस्थेमध्ये आयुष्य पुढे चालवण्याकरिता जगभरातील नागरिक सध्या केवळ आणि केवळ कोरोनावर मात करेल अशा प्रभावी लशींच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लास तयार करण्याचे काम जगभरात युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देश कोरोवर लास बनवत आहेत.मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. कारण संपूर्ण जग ज्या दिवसाकडे डोळे लावून बसलं होतं, तो दिवस अखेर आलाच. रशियाने कोरोना लस तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली. इतकंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं.लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आहे.

दोन आठवड्यांत रशियन कोरोना लशीची पहिली बॅच तयार होणार आहे. 20 पेक्षा अधिक देशांकडून रशियन लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती रशियाने दिली आहे.रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितलं, आरोग्य कर्मचाऱ्यांसह कुणालाही ही लस घेता येणार आहे. रशियाने यासाठी एक स्पेशल ट्रेसिंग अॅप तयार केलं आहे. या अॅपमार्फत लस घेणाऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जाईल. त्यांच्यावर या लसीचा काय परिणाम होतो किंवा काही दुष्परिणाम तर होत नाही ना हे अॅपच्या माध्यमातून तपासलं जाईल.

स्पुतनिक न्यूजचा हवाला देत लाइव्ह मिंटने हे वृत्त दिलं आहे.जगभरातील कोरोना लशीच्या स्पर्धेत रशियाने बाजी मारली आहे. रशियाने जगातील पहिली कोरोना लस तयार केली आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं.