बीडच्या शिरपेचात 10 वर्षीय आर्यन कुटेचा मानाचा तुरा!
आई -वडिलांच्या अतुलनीय कार्याप्रमाणेच आर्यन कुटेची यशस्वी वाटचाल सुरु!
12 Aug :- बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास अभिमान वाटावा असा पराक्रम बीड जिल्ह्यातील दहा वर्षीय आर्यन कुटे या मुलाने केला.आर्यन कुटे हा बीड जिल्ह्यातील लोकप्रिय आणि नामांकित असलेला ब्रँड तिरुमला ऑइल कंपनीचे चालक-मालक श्री सुरेश कुटे आणि सौ.अर्चना कुटे यांचा मुलगा आहे.तिरुमला ऑइल कंपनीची लोकप्रियता आजच्या स्थितीमध्ये असामान्य आहे. फक्त बीडच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात लोकांच्या पसंतीस पात्र ठरलेले खाद्य तेल म्हणजे तिरुमला ऑइल.बीड जिल्ह्यातील अशी पहिली कंपनी जिचे कीर्ती भारता बाहेर देखील पोहचली आहे.दुबई,श्रीलंका सारख्या देशाने बीडमधील तिरुमला ऑइल कंपनीला पुरस्काराने सन्मानित केले आहे.
द कुटे ग्रुप म्हटले की अनेक गरजवंतांच्या सेवेसाठी तत्पर असणारा ग्रुप अशी प्रतिमाच या द कुटे ग्रुपची समाजामध्ये उमटलेली आहे.समाजहितासाठी सदैव कार्यरत असणारा कुटे ग्रुप अनेक नवनवीन प्रोजेक्ट घेऊन डोळ्यांसमोर ठेऊन,ठाम ध्येय बाळगून औद्योगिक क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत आहे.
हे वाचा- दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय.
द कुटे ग्रुपच्या माध्यमातून तब्ब्ल ४४ कंपन्यांचे नेतृत्व यशस्वीरीत्या करणाऱ्या आई-वडिलांचा औद्योगिक क्षेत्रामढील वारसा पुढे चालवण्याचे काम १० वर्षीय आर्यनने अवघ्या दहाव्या वर्षापासूनच केले आहे.
आर्यन सरेश कुटे 0AO INDIA चे CMD याने वयाच्या १० व्या वर्षी OAO INDIA ची स्थापना केली. आणि द कुटे ग्रुप मध्ये IT क्षेत्राची निर्मिती केली. OAO INDIA मध्ये गेमिंग, डिजिटल मार्केटिंग आणि वेब डेव्हलपमेंट अशी कामे चालतात.बीडमधील नामंकित पोदार इंटरनॅशनल शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्यनमध्ये लहानपणापासूनचे नेतृत्व करण्याचे गुण आहेत.अभ्यासासह सर्वच गोष्टींमध्ये अव्व्ल असणाऱ्या १० वर्षीय आर्यन कुटेला कृष्णाचे विशेष आकर्षण असल्या कारणाने कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून लहानांपासून थोरांपर्यंतच्या करमणुकीकरिता 0AO INDIA कंपनीच्या माध्यमातून ‘कृष्ण माखन मस्ती नावाचा मोबाईल गेम लॉन्च केला आहे.’ आर्यनच्या वयातील लहान मुले मोबाईलवर सर्रासपणे गेम खेळताना दिसतात.
हे वाचा– जिल्हा परिषद नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०.
मात्र लहानपणापासून उराशी स्वप्न बाळगणाऱ्या आर्यनच्या मनात वेगळेच काहीतरी सुरू होते.आर्यन कुटेने याविषयी सांगितले की, “मला लहानपणापासून माझ्या आई-वडिलांसारखे लोकांसाठी काम करायची इच्छा आहे. माझे आई-वडील सतत मोठे ध्येय घेऊन आयुष्याची वाटचाल करतात मग मला सुद्धा माझं स्वतःच एक ध्येय घेऊन आयुष्यात माझ्या आई-वडिलांचे नाव मोठे करायचे आहे.मग मोबाईलवर गेम खेळताना वाटायचे की मी सुद्धा सर्वांना सहजरित्या खेळता यावा असा एक मोबाईल गेम बनवावा,मी स्वतः तयार केलेला मोबाईल गेम प्रत्येकाने मोबइलवर खेळावा.”: बस मग काय उराशी बाळगलेल्या स्वप्नाकडे वाटचाल सुरू केली .
अनेक महिन्याच्या कठीण परिश्रमांनंतर आर्यन व आर्यन च्या OAO INDIA कंपनीच्या माध्यमातून ‘कृष्ण माखन मस्ती’ नावाचा मोबाईल गेम लॉन्च केला. आर्यन यांनी बीड सारख्या ठिकाणाहून त्यांच्या पुण्याच्या OAO INDIA टीम ला नेतृत्व करून हा गेम बनवला आहे.’कृष्ण माखन मस्ती’ या मोबाईल गेमला सर्वत्र स्तरावरून भरगच्च प्रतिसाद मिळाला आहे.’कृष्ण माखन मस्ती नावाचा मोबाईल गेम प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरमध्ये आहे.प्रत्येकाने ‘कृष्ण माखन मस्ती’ नावाचा मोबाईल गेम डाउनलोड करून घ्यावा. आर्यनने उचलले पाहिले पाऊल पूर्णतः यशस्वी पडल्याने आर्यनचे स्वप्न इच्छाशक्ती आणखी प्रखर झालेली आहे. येत्या काही दिवसांत आर्यन कुटे कृष्ण माखन मस्ती या मोबाईल गेम पेक्षाही मोठा असणारा आणखी एक गेम लॉन्च करणार असल्याचे जाहीर केले आहे.
अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी 0AO INDIA या कंपनीची स्थापना करून.स्वतःची एक टीम तयार करून लहानपणापासूनच स्वप्न यशवीरित्या साकार करणाऱ्या आर्यन कुटेचे कौतुक आणि अभिनंदन सर्वत्र स्तरावरून सर्वत्र होत आहे.आर्यन येणाऱ्या काळात नक्कीच गरुडझेप घेऊन आपल्या आई-वडिलांप्रमाणेच बीड जिल्ह्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवेल असा विश्वास द कुटे ग्रुपच्या संपूर्ण परिवाराला, मित्रवर्गाला,निकटवर्तीयांना आणि बीडमधील नागरिकांना वाटत आहे.