महाराष्ट्र

कोरोना रुग्णलयातील निष्कजीपणा;बेपत्ता असलेल्या रुग्णाचा आढळला मृतदेह!

12 Aug :- कोरोना विषाणूचा कहर सध्या सावत्रच भयानक स्वरूपात सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना सेवा देण्यात प्रशासन अपुरे पडत असल्याचा अंदाज काढल्या जात आहे.अशीच एक संतापजनक घटना जळगाव येथील अमळनेरच्या कोरोना रुग्णलयामध्ये घङली आहे. अमळनेरच्या कोरोना रुग्णलयामधून एका तरुण रुग्ण बेपत्ता झाला आणि नंतर त्याचा काही दिवसाने मृतदेह आढळला.या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

वावडे येथील सुनील दिलभर पाटील (वय 32) हा तरुण आरोग्य विभागाने आयोजित शिबिरात स्वॅब घेतल्यानंतर पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. रुग्णवाहिकेने 9 तारखेला त्याला प्रताप महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरला दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला श्वसनाचा त्रास होत होता त्यात त्याच्या हाताला जखम असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कक्षात उपचारासाठी हलवले होते.

काल सकाळी सुनील पाटील ग्रामीण रुग्णालयात दिसून आला नाही म्हणून कर्मचारी व डॉक्टरांनी त्याचा शोध सुरू केला. तो आढळून आला नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला जाऊन रुग्ण सुनील विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास सुनीलचा मृतदेह नगर पालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यानंतर रूग्णवाहिकेने ताबडतोब मृतदेह हलवून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. नगरपालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह सापडलेली जागा सॅनिटाईज केली आहे.