News

बीड – कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू

अंबाजोगाईतील ४, परळीतील एक आणि केजमधील एका रूग्णाचा समावेश

अंबाजोगाई : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्ये बरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. अत्यावस्थ झालेल्या कोरोना रूग्णांवर अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार करण्यात येतात. मंगळवारी रात्रीपासून अवघ्या १३ तासात सहा कोरोना रूग्णांचा स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यात तीन पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा समावेश असून ते अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत.