देशहिताचे नवे उद्धिष्ठ घेऊन नरेंद्र मोदींच्या वाटचालीस वेग!
11Aug :- दहा राज्यांमध्ये ॲक्टीव्ह केसेसचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. याराज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनामुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही दहा १० राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे ७२ तास महत्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची लापरवाई आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.