रशिया निर्मित ‘कोरोना लस’ भारतात दिली जाणार?
11 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीचे जीवन विस्कळीत आणि उद्धवस्त करून टाकले आहे.जभरातील देशांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे कोरोना विषाणूने मोडले आहे. सर्व सामन्यांच्या बेहाल झाले असून एक वेळेसच्या भाकरीसाठी देखील सामान्य माणूस मौताज झाला आहे. अशा भयाण अवस्थेमध्ये आयुष्य पुढे चालवण्याकरिता जगभरातील नागरिक सध्या केवळ आणि केवळ कोरोनावर मात करेल अशा प्रभावी लशींच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लास तयार करण्याचे काम जगभरात युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देश कोरोवर लास बनवत आहेत.मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. कारण संपूर्ण जग ज्या दिवसाकडे डोळे लावून बसलं होतं, तो दिवस अखेर आलाच. रशियाने कोरोना लस तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली. इतकंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं.रशियाने जगातील पहिली कोरोना लस तयार केली आहे. ‘Sputnik V’ असं या लशीला नाव देण्यात आलं आहे.या लशीसाठी जगभरातील 20 देशांनी आधीच ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत.
रशियन लस भारतातही दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.भारताला आतापर्यंत ऑक्सफर्डच्या कोरोना लशीकडून आशा होती. या लशीमध्ये भारताची भागीदारीही आहे. मात्र ही लस सध्या क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि रशियाने आपली कोरोना लस तयार असल्याची आनंदाची बातमी दिली. त्यामुळे या लशीकडे सर्वांचं लक्ष लागलं.”रशियाची ही लस जर यशस्वी ठरली तर ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे पाहावं लागेल आणि तसं असेल तर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे”, असं दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.