बीडकरांनो सावधान! भगर खाणाऱ्या शंभर जणांना विषबाधा
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे धक्कादायक घटना!
11 Aug :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांचे बेहाल झाले आहेत. आणि आता वरून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. गोकुळाष्टमीला अनेक जण उपवास धरतात.गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाणाऱ्या १०० जणांना विषबाधा झाल्याची घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भगर खाणाऱ्या १०० व्यक्तींना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन ज्या कोणाला त्रास होत असेल त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती.
भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला.सायंकाळी चार नंतर गावातील जवळपास शंभरहून अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदळ उडाली. त्रास जाणवू लागलेल्या महिला, ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.