रैना ट्रोल! रैना साहेब,तुमच्या आयुष्यात आई-वडिलांना स्थान का नाही..?
11 Aug :- भारतीय क्रिकेट संघातील लोकप्रिय उत्कृष्ट खेळाडू सुरेश रैनाची प्रतिभा आणि लोकप्रियता असामान्य आहे. क्रिकेट प्रेमींमध्ये रैना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून आणि स्फोटक फलंदाज म्हणून लोकप्रिय आहे. सध्या आयपीएलवर लक्ष्य केंद्रित करणारा रैनाचे सध्या आयपीएलवर लक्ष्य केंद्रित आहे, 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये याची सुरुवात होणार आहे. काही दिवसांतच खेळाडू युएईसाठी रवाना होतील. मात्र याआधीच सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.
रैनाने नुकतेच काढलेल्या टॅटूंचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तो ट्रोल होत आहे., 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये याची सुरुवात होणार आहे. काही दिवसांतच खेळाडू युएईसाठी रवाना होतील. मात्र याआधीच सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. रैनाने नुकतेच काढलेल्या टॅटूंचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तो ट्रोल होत आहे.रैनाने त्याच्या दोन्ही हातावर पत्नी प्रियंका आणि दोन्ही मुले ग्रेसिया-रिओ यांच्या नावांचे टॅटू काढले आहेत.
टॅटू काढतानाचा फोटो शेअर करताना रैनाने असे लिहिले आहे की, ते मला जगण्याचे कारण देतातरैनाच्या या पोस्टनंतर चाहत्यांंनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आई-वडिलांना स्थान का नाही असा सवाल चाहत्यांनी विचारला आहे.एका फॅनने सुरेश रैनाला असे विचारले की, तुम्ही आई-वडिलांच्या नावाचा टॅटू कधी बनवला आहे का?
ज्यांनी तुम्हाला जन्म दिला.. ज्यांच्यामुळे तुम्ही या आयुष्यात आलात?तर एका चाहत्याने रैनाला असा सवाल केला आहे की, आईवडिलांशिवाय आयुष्याची काय ती कल्पना?भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाने केलेल्या टॅटूच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्याने त्याला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे.अजूनतरी रैनाने कोणत्याही चात्यांच्या प्रश्नास उत्तर दिलेले नाही.