देश विदेश

अदभूत! ‘या’ महिला पंतप्रधाननं देशात कोरोनाला रोखले

१०० दिवसांपासून देशात रोखले कोरोनाला!

11 Aug :- जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे.कोरोना विषाणूचे संक्रमण गुणाकार पद्धतीने वेगाने पसरत आहे. जगभरातील देश कोरोनाच्या संक्रमनास आटोक्यात आणण्याकरिता धपड्तो आहे. अनेक युक्त्या-शक्कल लढवून देखील कोरोनाचे संक्रमण विकोपाला जात आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील असे देश आहेत ज्यांनी कोरोनावर मात केली आहे.

आशा भयाण परिस्थितीमध्ये भारत, अमेरिका आणि ब्राझिलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जगभरात न्यूझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचं कौतुक होतंय.कारण न्यूझिलंड हा त्यापैकी एक देश आहे. 100 दिवसात इथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.102 व्या दिवशी न्यूझिलंडमध्ये एक रुग्ण आढळला आहे.

एवढे दिवस कोरोनाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी नेमके त्यांनी काय काय केलं हा प्रश जगभरातील नागरिकांना आणि प्रशासनाला पडला आहे. न्यूझिलंडमध्ये 3 फेब्रुवारीपासून चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश बंद करण्यात आला होता.15 मार्चपासून परदेशी नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता.

परदेशातून परत आलेल्यांना न्यूझिलंडने क्वारंटाईन केलं.26 मार्चपासून देशात कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला.8 जूनला सरकारने देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. तर 1 मेला कम्युनिटी ट्रान्समिशनचा शेवटचा रुग्ण समोर आला.1 मे पासून 103 दिवसांनी सरकारने लॉकडाऊनचे निकष शिथिल केले. तर 9 ऑगस्टला कम्युनिटी ट्रान्समिशनमुळे एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याला 100 दिवस पूर्ण झाले.

न्यूझिलंडमध्ये आजही कोरोना अॅक्टिव्ह केसेस फक्त 23 आहेत, तर या देशात कोरोनामुळे आतापर्यंत फक्त 22 जणांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील प्रत्येक देशाने अशा पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच कोरोनाचा शिरकाव कुठल्याच देशात होणार नाही हे नक्की.