बीड

गर्दीच गर्दी जिकडे तिकडे चोहीकडे!

बीड जिल्ह्यात सोशल डिस्टन्सचे तीन-तेरा!

11 Aug :- बीड जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विषाणूच संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्याचे कर्तृत्वान जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी बीड जिल्ह्यातील ५ शहरात येत्या १२ तारखेपासून ते २१ तारखेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदी दरम्यान लागणाऱ्या जीवनवश्यक गोष्टींसाठी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदीच्या एक दिवस अगोदरच सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत सर्वत्र गर्दी केली आहे. किराणा दुकान,भाजी मंडई,इतरत दुकाने,रस्त्यावर ‘गर्दीच गर्दी जिकडे तिकडे चोहीकडे’ असे चित्र दिसून आले आहे.

बीड जिल्ह्यात सोशल डिस्टन्सचे तीन-तेरा!


संचारबंदी दरम्यान लागणाऱ्या जीवनवश्यक वस्तू मिळणार नसल्याने नागरिकांनी आजच सर्वत्र जाऊन वस्तूंची खरीदी करण्यास सुरुवात केली. संचारबंदी दरम्यान काही सन-उत्सव असल्या कारणाने देखील काही वस्तू खरेदी करणे आत्यावश्यक असल्याने आज रस्त्यावर सर्वत्र तुडुंब गर्दीचे भयानक चित्र दिसून आले.

अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी असून देखील रस्त्यावरी गर्दी आवाक्याच्या बाहेर जात असल्याचे दिसून येत होते.बीड जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांची व्दिशासकीय नोंद होत असताना देखील तुडुंब गर्दीने भरलेल्या रस्त्यावर अनेक नागरिकांनी तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते. घुटखा,तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून गर्दीमध्ये सर्रासपणे थुंकणारे सुद्धा नागरिक बिनधास्त फिरत होती.

संचारबंदीपूर्व बीड…

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याकरिता संचारबंदीचा उपाय काढला आहे.मात्र आजच्या नागरिकांच्या बेशिस्तपणे वागण्याने संचारबंदी दरम्यान आणि संचारबंदी नंतर कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात येईल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.